रेडिएशन थेरपी – समज आणि गैरसमज

रेडिएशन थेरपी हि कॅन्सरच्या  महत्वाची उपचार पद्धती आहे. रेडिएशन थेरपी म्हणजे ionizing rays चा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी करणे. Ionizing radiation मध्ये high energy x -ray, gamma rays, electrons आणि protons या किरणांचा समावेश होतो. 

रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट ही एक OPD basis उपचार पद्धती आहे. या उपचारासाठी गरजेनुसार  साधारण रेडिएशनचे २५ ते ३५ सेशन्स दिले जातात. palliative रेडिएशन साठी १ ते १० radiation ची गरज असते. रेडिएशन थेरपी आठवड्यातून साधारण ५ दिवस दिली जाते आणि उपचाराचा पूर्ण कालावधी ५ ते ७ आठवडे असू शकतो. उपचारासाठी रोज साधारण १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो.  रेडिएशन थेरपीच्या पहिल्या दिवशी रुग्णाचा एक साचा किंवा immobilization बनवले जाते आणि रुग्णाचा  CT  scan केला जातो. यानंतर या CT स्कॅन images वरती radiation  planning केले जाते. Radiation planning साठी १ ते ३ दिवस लागू शकतात. plan तयार झाल्यानंतर उपचाराला सुरवात होते. रेडिएशन थेरपी चे ३ DCRT , IMRT, IGRT VMAT हे विविध प्रकार आहेत.

कॅन्सरचे निदान झालेल्या रुग्णांपैकी ७० ते ८०% लोकांना त्यांच्या उपचारादरम्यान रेडिएशन थेरपीची गरज पडू शकते. 

रेडिएशन थेरपी विषयीच्या गैरसमजुती

1.गैरसमजूत : रेडिएशन थेरपी करताना वेदना होतात 

रेडिएशन थेरपी देताना कोणत्याही प्रकारची वेदना, heat, किंवा शॉक लागत नाही. रेडिएशन थेरपी करताना रुग्णाला १० ते १५ मिनिट मशीनमध्ये झोपावे लागते. उपचार होताना रुग्णाला काहीही समाजात नाही. 

2. गैरसमजूत : रेडिएशनमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास होतो 

रेडिएशन थेरपीमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना कोणताही  नसतो. रुग्णाच्या शरीरामधून कोणतेही rays बाहेर येत नाहीत . 

3. गैरसमजूत : रेडिएशन थेरपीमुळे केस जातात 

जर डोक्याच्या भागामध्ये रेडिएश थेरपी केली जात असेल तरच केस जातात. शरीराच्या ज्या भागाचा उपचार चालू आहे त्या भागाचे केस जातात. पूर्ण शरीराचे केस जात नाहीत. 

4.गैरसमजूत : रेडिएशन थेरपी म्हणजे heat, shock. 

रेडिएशन थेरपी म्हणजे कॅन्सर वरती किरणोत्साराचा मारा करणे. रेडिएशन उपचारामध्ये कोणतेही प्रकारची उष्णता किंवा शॉक लागत नाही. 

5.गैरसमजूत : रेडिएशन थेरपी ही फक्त शेवटच्या स्टेजच्या आजारामध्ये वापरली जाते 

रेडिएशन थेरपी ही कॅन्सरच्या सर्व स्टेज मध्ये वापरली जाऊ शकते. रुग्णाच्या आजाराचा प्रकार आणि त्याची स्टेज नुसार उपचार ठरवले जातात.

6.गैरसमजूत : रेडिएशन थेरपी मुळे कॅन्सर होतो 

रेडिएशन थेरपी मुळे mutations  होऊन कॅन्सर होण्याची थोडी शक्यता असते मात्र रेडिएशन थेरपीमुळे  होणारा फायदा हा कॅन्सरच्या धोक्यापेक्षा खूप जास्त असतो. गर्भवती स्त्रियांना शक्यतो रेडिएशन थेरपी दिली जात नाही.

Download Our App
× How can I help you?